नाशिक, ०६ डिसेंबर (हिं.स.) : भारतीय घटनेचे शिल्पकार, दलित, दीनदुबळ्यांचे कैवारी भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा 67 वा महापरिनिर्वाणदिना निमित्त भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, सरचिटणीस काशिनाथ शिलेदार, रोहिणी नायडू, ॲड.शाम बडोदे, अनु.जाती मोर्चा प्रदेश महामंत्री दिनेश पगारे, उपाध्यक्ष गणेश कांबळे, चिटणीस तेजस निरभवणे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष राकेश दोंदे यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करुन धम्मदिप भंते यांनी बुध्द वंदना व भिम स्तुती केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित आणि समाजातील दीनदुबळ्यांच्या न्याय हक्कासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. ते राज्य घटनेचे शिल्पकार होते. घटना लिहिताना त्यांनी दलित आणि वंचित घटकांना जास्तीतजास्त आरक्षण आणि सरंक्षण कसे मिळेल याची काळजी घेतली. आज दलित आणि समाजातील उपेक्षित घटक सर्व क्षेत्रात प्रगती करीत आहेत आणि आज या घटकाला मान सन्मानही मिळत आहे त्याला डॉ.बाबासाहेबांचे अथक प्रयत्न आणि त्यांनी त्यासाठी केलेला संघर्ष कारणीभूत आहे असे, शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले. प्रास्तविक कुंदन खरे यांनी केले.
हिंदुस्थान समाचार
