भंडारा, ६ ऑक्टोबर, (हिं. स.) : राज्य सरकारने प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांनी ऑफिसला येताना सकाळी 9:30 ला यावे असे सांगितले होते. या नियमांचे पालन काही महिने कऱण्यात आले. मात्र कर्मचारी यांनी शासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवली असून मनमर्जी प्रमाणे सर्व विभागात कर्मचारी येताना दिसत आहेत.
भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी स्वतः वेळेवर येतं जिल्हा परिषदेच्या दारावर लेत लतीप येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा क्लास घेतला आहे. त्यांची नोंदणी देखील कऱण्यात आली आहे. दररोज हे अधिकारी कर्मचारी असेच उशीरा आलेत तर त्यांच्यावर कारवाही केली जाणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले आहे.
– हिंदुस्थान समाचार
