धुळे, 13 डिसेंबर (हिं.स.) एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, धुळे अंतर्गत सन 2023-2024 या आर्थिक वर्षांत पंचायत समितीच्या सेस फंडातून निधीच्या 10 टक्के अनुदानातून सर्वसाधारण व दारिद्रय रेषेखालील महिलांसाठी इलेक्ट्रीक शिलाई मशिन पुरवठा योजनेच्या अर्ज सादर करण्यासाठी 18 डिसेंबर, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.अशी माहिती एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, धुळे बालविकास प्रकल्प अधिकारी दिपाली हिवराळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज 18 डिसेंबर, 2023 पर्यंत पंचायत समिती, धुळे येथे सादर करावे,असे अवाहन पंचायत समितीच्या सभापती वंदना मोरे, उपसभापती देवेंद्र माळी यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार
