नवी दिल्ली, १३ डिसेंबर (हिं.स.) : लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारत रंगीत धुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या. हा सोसलेला धूर सर्वसाधारण धूर होता. तसेच या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे. तपासाअंतर्गत जे काही समोर येईल, ती माहिती संसदेच्या सदस्यांबरोबर मी स्वत: शेअर करेन, असे निवेदन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले. तसेच सध्या कोणतीही चिंता करण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले.
ओम बिर्ला यांनी संसदेच्या सभागृहात घुसखोरी करणाऱ्या दोन्ही संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती दिली. संसदेच्या बाहेरही दोघांना अटक करण्यात आली. सभागृहामध्ये उडी मारणाऱ्यांना दोघांना अटक करून त्यांच्याकडील सर्व सामान ताब्यात घेतले आहे. संसदेबाहेर आंदोलन करणाऱ्या दोघांनाही अटक करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
