पुणे 17 ऑक्टोबर (हिं.स) छत्रपती शिवाजी महाराजांवर आता पदव्युत्तर पदवी प्राप्त करता येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण व सामरिक विभागाला शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून प्रत्यक्ष अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. महाराजांची शासन व्यवस्था, संरक्षण आणि सामरिक व्यवस्थेचा विद्यार्थ्यांना शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करता येणार आहे. यामुळे भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांसह स्वराज्यासंदर्भातील संशोधनाला अधिक चालना मिळणार आहे.राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशातच अशा प्रकारातील हा पहिला अभ्यासक्रम आहे. एम.ए. इन छत्रपती शिवाजी महाराज व्हीजन ॲण्ड नेशन बिल्डींग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभ्यासक्रमाला पुढील वर्षापासून प्रवेश घेता येणार आहे. विभागप्रमुख आणि विद्यापीठातील मानवविज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे सांगतात, गनिमी काव्यापासून ते सागरी सुरक्षेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीचे अनेक पैलू आहेत.
हिंदुस्थान समाचार
