छत्रपती संभाजीनगर, 7 सप्टेंबर (हिं.स.)।पैठण शहरातील उत्साहवर्धक आणि भक्तिभावाने भरलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत जल्लोष होता . गणेश भक्तांच्या “गणपती बाप्पा मोरया” या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले. ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात आणि पारंपरिक सजावटीत नटलेल्या मिरवणुकीत सहभागी होताना भाविकांना जनतेच्या श्रद्धेचा आणि संस्कृतीशी असलेल्या नात्याचा अनुभव अनमोल ठरला. या विसर्जनाच्या वेळी सर्वांच्या समवेत डान्स करण्याचा अनेकांना मोह आवरता आला नाही. गणरायाला निरोप देताना प्रत्येकाच्या डोळ्यात भावुकता होती, पण त्याचवेळी पुढील वर्षीच्या आगमनाची उत्सुकता देखील स्पष्ट दिसत होती.
————–
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis
