cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > आयुर्वेद प्रसारासाठी अधिक प्रयत्नांची गरज – श्रीपाद नाईक
Regional

आयुर्वेद प्रसारासाठी अधिक प्रयत्नांची गरज – श्रीपाद नाईक

CliQ INDIA
Last updated: January 20, 2024 7:30 pm
CliQ INDIA
Share
5 Min Read
SHARE

ठाणे, २० जानेवारी, (हिं.स) : विश्वामध्ये अनेक चिकित्सा आहेत, परंतु आयुर्वेद ही पद्धती विशेष आहे. आयुर्वेदासाठी आणखीन प्रयत्न केल्यास जगात आयुर्वेद आपण आणखी पुढे नेऊ शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.

”आयुर्वेद सर्वांसाठी-जीवनशैलीजन्य विकारांच्या व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन” या विषयावर आयुष मंत्रालय, भारत सरकारतर्फे ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य मेळा आणि एआयएसी कॉन, 2024 आयोजित करण्यात आले आहे. याचा शुभारंभ श्री.नाईक यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

”मी आयुष मंत्री असताना जो सन्मान तुम्ही मला दिला त्याच्यापेक्षाही जास्त सन्मान आजच्या कार्यक्रमामुळे मला दिला आहे”, असे प्रारंभी नमूद करून श्रीपाद नाईक पुढे म्हणाले की, जगामध्ये अनेक चिकित्सा पद्धती आहेत, परंतु आधुनिक जीवन आणि वेद अर्थात ज्ञान व जीवन कशाप्रकारे जगायचे हे सांगणे म्हणजे आयुर्वेद होय. आधुनिक जीवन जगताना आपल्या मूळ सिद्धांतावरच यावेच लागेल. कोरोनासारखे अनेक शत्रू यापुढेही हल्ला करण्यास सज्ज आहेत, अशावेळी आयुर्वेद सक्षम करणे गरजेचे आहे”, असे ते शेवटी म्हणाले.

भारतात सर्वात जास्त आयुर्वेदिक महाविद्यालय महाराष्ट्रमध्ये आहेत. त्यामुळे इथे एक स्वतंत्र आयुर्वेदिक विद्यापीठ व्हावे तसेच प्रत्येक बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात आयुर्वेदाचा समावेश होणे गरजेचे आहे असे मत महासंमेलानाचे अध्यक्ष पद्मश्री, पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा (अध्यक्ष, राष्ट्रीय आयुर्वेदिक विद्यापीठ आणि अखिल भारतीय आयुर्वेदिक महासंमेलन ट्रस्ट) यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर मुंबईत मरिन ड्राइव्ह परिसरात एक जुने मित्तल आयुर्वेदिक महाविद्यालय आहे ते बंद होण्याच्या मार्गावर आहे यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे आणि ती जागा आयुर्वेदाच्या कामासाठी उपयोगात आणावी अशी विनंती त्यांनी यावेळेस केली.

बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर आयुषच्या माध्यमातून काही सुयोग्य हस्तक्षेप करून होणारे दीर्घकालीन नुंकसान रोखण्याचा प्रयत्न आहे असे श्री आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा या संमेलनात म्हणाले. आयुर्वेदिक शाश्त्रातील उपायांचा आधुनिक वैद्यक उपचार पद्धतीत उपयोग करून रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढवताना रोगाच्या मुळाशी जाण्याचे प्रयत्न सुरु आहेत , असे ही ते पुढे म्हणाले. पथ्य- अपथ्य, दिनचर्या, ऋतुचर्या, पंचकर्म आणि अन्य उपचारपद्धतींचा संतुलित वापर केल्याने समाज स्वास्थ्य सुधृढ राहू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव आरती अहुजा यांनी आपल्या भाषणात यापुढे कामगार रुग्णालयांमध्ये आयुर्वेद उपचारासाठी 50 रुग्णशय्या ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. सार्वजनिक आरोग्य म्हणजे केवळ उपचार नसून प्रतिबंध करणे महत्वाचे असते. आजारावर प्रतिबंध आण्याची क्षमता ही केवळ आयुर्वेद मध्ये आहे असे देखील त्या यावेळेस म्हणाल्या.

यावेळी अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाची मोबाईल ॲप पत्रिका आणि 2024 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

आयुर्वेदासाठी विशेष कार्य करणाऱ्यांना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या महासंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून महासंमेलानाचे अध्यक्ष पद्मश्री, पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा (अध्यक्ष, राष्ट्रीय आयुर्वेदिक विद्यापीठ आणि अखिल भारतीय आयुर्वेदिक महासंमेलन ट्रस्ट) ,आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा, वैद्य जयंत देवपुजारी (चेअरमन, नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम्स ऑफ मेडिसीन), डॉ. मनोज नेसारी (ॲडव्हायजर (आयुर्वेद) मिनिस्ट्री ऑफ आयुष, भारत सरकार) आणि वैद्य राकेश शर्मा (प्रेसिडेंट, बोर्ड ऑफ इथिक्स अँड रजिस्ट्रेशन, एनसीआयएसएम), वैद्य मनोज, वैद्य रामदास आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. रमण गुंडाळकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.

या महासंमेलनात तणाव निमंत्रण, वेदना व्यवस्थापन, योग आणि आयुर्वेद, संधिविकार व्यवस्थापन, योग आणि सत्वावजय चिकित्सा, स्वस्थ जीवनासाठी आयुर्वेद, आयुर्वेदातून रोगप्रतिकारशक्ती, आयुर्वेदातील त्वचा व केसांची काळजी, स्त्री विकारांचे व्यवस्थापन, पचन विकारांचे व्यवस्थापन आयुर्वेदिक दिनचर्या व स्वास्थ्यपूर्ण आहार, सामान्य जीवनशैलीजन्य विकारांचे व्यवस्थापन या विषयांवर आयुर्वेदिक तज्ञांची मार्गदर्शक व्याख्याने होणार आहेत.

नागरिकांसाठी, कायचिकित्सा/जनरल मेडिसीन, त्वचाविकार, योग व डाएट, सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा आदी आजारांवर मोफत रुग्ण तपासणी, आयुर्वेदिक सल्ला-ओपीडी उपलब्ध असून, आयुर्वेदिक तज्ञांमार्फत ही तपासणी विनामूल्य केली जाणार आहे.

ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन व श्री समर्थ सेवक मंडळ, डॉ. मूस मार्ग, ठाणे पश्चिम येथे 19 ते 22 जानेवारी 2024 दरम्यान हे आयुर्वेदिक महासंमेलन सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत संपन्न होत आहे. मैदानात 55 नामांकित आयुर्वेदिक औषधांचे स्टॉल्स आहेत, जे नागरिकांना सवलतीच्या दरात आयुर्वेदिक औषध उपलब्ध करून देतील. या सुवर्णसंधीचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

एकनाथ शिंदे यांनी घेतली कस्पटे कुटूंबियांची भेट | BulletsIn
लातूर – निलंग्यात बुकिंग करूनही गॅस मिळेना
मुंबईत एचआयव्ही एड्स जनजागृतीसाठी रविवारी ‘रेड रन मॅरेथॉन’ स्पर्धा | BulletsIn
नमुंमपात 3 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिन | BulletsIn
दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी सात रुपये अनुदान | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article पुणे शहरात ४७ लाख रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त
Next Article अयोध्या : स्पाइसजेट सुरू करणार 8 शहरातून विमानसेवा
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?