एचआयव्ही / एड्सच्या जनजागृतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेने विविध उपक्रम आयोजित केले आहेत. या अंतर्गत, ‘रेड रन मॅरेथॉन’ स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, रिल मेकींग स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा यांचा समावेश आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवकांमध्ये आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही / एड्सविषयी जागरूकता वाढविण्यात येणार आहे.
BulletsIn
- मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था एचआयव्ही / एड्ससाठी जनजागृती कार्य करत आहे.
- राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या मार्गदर्शक नियमांनुसार मुंबईत एचआयव्ही एड्सच्या नियंत्रणासाठी काम करीत आहे.
- ११ ऑगस्ट २०२४ रोजी ‘रेड रन मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
- मॅरेथॉनची थीम ‘Run to end AID’S’ असून यंदा महाविद्यालयीन युवकांमध्ये जनजागृती करणे मुख्य उद्दिष्ट आहे.
- ‘रेड रन मॅरेथॉन’ स्पर्धेला उपायुक्त श्री. संजय कुऱहाडे आणि प्रकल्प संचालक श्री. विजय करंजकर यांची उपस्थिती असणार आहे.
- मॅरेथॉनची सुरुवात वडाळा स्थित मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या कार्यालयापासून होईल.
- सर्वसामान्य नागरिकांना या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध असेल.
- महाविद्यालयीन युवकांसाठी पथनाट्य आणि रिल मेकींग स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.
- शालेय विद्यार्थ्यांसाठी एचआयव्ही / एड्सवर प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली जाईल.
- मुंबईतील १४० महाविद्यालयांमध्ये रेड रिबन क्लब आणि राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत जनजागृती कार्यक्रम सुरू आहेत, तसेच २५० माध्यमिक शाळांमध्ये किशोरवयीन शिक्षण कार्यक्रम राबवले जात आहेत.
