cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > ओबीसी प्रवर्गातील युवक-युवतींकरीता महामंडळाच्या विविध कर्ज योजना
Regional

ओबीसी प्रवर्गातील युवक-युवतींकरीता महामंडळाच्या विविध कर्ज योजना

CliQ INDIA
Last updated: October 14, 2023 3:16 pm
CliQ INDIA
Share
5 Min Read
SHARE

चंद्रपूर 14 ऑक्टोबर –  महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत 2023-24 या आर्थिक वर्षासाठी शासनाच्या बीज भाडंवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना तसेच महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण योजना व महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेकरीता उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान इच्छुक युवक-युवतींनी सदर कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक किशोर सातपुते यांनी केले आहे.

1 लक्ष रुपयाची थेट कर्ज योजना : शासनाने इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गासाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगार व लघुउद्योग सुरू करण्याकरीता 1 लाख रुपयांची विना व्याज थेट कर्ज योजना सुरु केली आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी हा 4 वर्षापर्यंतचा आहे. तर सदर योजनेत नियमित परतफेड न करणाऱ्या लाभार्थींना द.सा.द.शे 4 टक्के दराने व्याज आकारण्यात येईल.

5 लक्ष रुपये पर्यंतची 20 टक्के बीज भांडवल योजना : बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत कमाल मर्यादा रु. 5 लाखापर्यंतच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात येते. कृषी व संलग्न व्यवसाय, वाहतूक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तसेच पारंपारिक लघु व सेवा उद्योगासाठी महामंडळामार्फत कर्ज देण्यात येते. नाविन्यपूर्ण व्यवसायासाठी कर्ज मंजुरीस प्राधान्य देण्यात येईल. मंजूर कर्ज रकमेच्या 5 टक्के लाभार्थी, 20 टक्के महामंडळ व 75 टक्के बँकेचा सहभाग आहे. महामंडळाच्या कर्ज रकमेवर रकमेवर 6 टक्के व्याज दर असून बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेचा व्याजदर लागू राहील. सदर कर्जाची परतफेड 5 वर्षापर्यंत करता येईल.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना : उद्देश : इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरजू व कुशल व्यावसायिक व्यक्तींना व्यवसायाकरीता कर्ज उपलब्ध करून देणे.

योजनेचे स्वरुप : बँकेने र 10 लक्ष रुपये पर्यंतच्या मर्यादित कर्ज मंजूर केलेल्या अर्जदाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यानंतर व्याजाची रक्कम (12 टक्के मर्यादेत) अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. सदर योजना ही संपूर्णपणे संगणीकृत आहे. तर कर्ज परतफेडीचा कालावधी बँक निकषानुसार राहील.

गट कर्ज व्याज परतावा योजना : इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महामंडळाच्या निकषांनुसार विहित केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांचे बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी अशा शासन प्रमाणीकरण प्राप्त संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार, उद्योग उभारणी करीता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.

योजनेचे स्वरुप : नॉन क्रिमीलेअर असलेल्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादीत गटांकरीता, बँकेकडून प्रती गटास कमीत कमी 10 लक्ष ते जास्तीत जास्त 50 लक्ष रुपये पर्यंतच्या मंजूर उद्योग उभारणीकरीता कर्ज देण्यात येते. मंजूर कर्जावर 5 वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जो कमी असेल तो, तसेच कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर जास्तीत जास्त 12 टक्के व्याजदराच्या आणि 15 लाख रुपयांच्या मर्यादेत त्यातील व्याजाची रक्कम अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. महामंडळ केवळ बँकेने वसूल केलेली व्याज रक्कम अदा करेल. इतर कोणतेही शुल्क, देयके अदा करणार नाही.

कौशल्य विकास प्रशिक्षण योजना : राज्यातील इतर मागासवर्गीय समाजातील परंपरागत व्यवसायांचे आधुनिकीकरण झाले असल्यामुळे त्या परंपरागत व्यवसायात कार्यरत असलेल्या तसेच इतर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या इतर मागासवर्गीय समाजातील पात्र व्यक्तींना आधुनिक प्रशिक्षणाचा लाभ व्हावा तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून त्यांना कौशल्यपूर्ण बनविणे व त्याद्वारे रोजगार किंवा संरोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचे उद्देश आहे. यासाठी ओबीसी महामंडळाच्या एमएसएसडिएस च्या वेबपोर्टलवर उमेदवाराने नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना : इतर मागास प्रवर्गातील गरीब होतकरपरितक्त्या महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे. राज्यातील महिला बचत गटातील इतर मागास प्रवर्गातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे उत्पादन, प्रक्रिया, मूल्य आधारित उद्योगांकरिता बँकामार्फत मंजूर करण्यात आलेल्या 5 ते 10 लाख रुपये पर्यंतच्या कर्ज रकमेवरील 12 टक्के व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा उपलब्ध करून देण्यात येईल.

तरी, इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी 07172-262420 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. अथवा कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन जलनगर, चंद्रपूर येथे प्रत्यक्षपणे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, अशी माहिती दिली.

You Might Also Like

पंढरपूर नगरपालिकेची प्रस्तावित मालमत्ता करवाढ रद्द करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या सूचना – दिलीप धोत्रे
पुणे – विभागीय आयुक्त कार्यालय येथे कार्बन न्युट्रलिटी सुविधा कक्षाची स्थापना
काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीवर भर देणार – नाना पटोले
सी आय एस सी ई जिम्नॅस्टिक्स टूर्नामेंट २०२३ मध्ये अशोकाच्या खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी
पोलिस भरतीत होणार ‘एआय’चा वापर

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article चंद्रपुरात डॉ. आंबेडकर महामानवाचा जीवनप्रवास विषयावर मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शन
Next Article चंद्रपूर : आदिवासी उमेदवारांकडून स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरीता अर्ज आमंत्रित
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?