महाराष्ट्रातील जलाशयांमध्ये पाणीसाठ्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. एप्रिल महिना अद्याप संपलेला नाही, तर दुसरीकडे राज्यातील प्रमुख धरणांमध्ये केवळ 41 टक्केच पाणीसाठा उरलेला आहे. पावसाळा येण्यासाठी अजून अडीच ते तीन महिने बाकी आहेत, त्यामुळे राज्याला मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले उजनी धरण चिंतेची बाब ठरत आहे.
BulletsIn
-
महाराष्ट्रातील जलाशयांमध्ये केवळ 41% पाणीसाठा शिल्लक आहे.
-
एप्रिल महिना संपलेला नाही आणि पावसासाठी अजून सुमारे 3 महिने शिल्लक आहेत.
-
पाणीसाठा कमी असल्याने राज्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
-
पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगरसाठी उजनी धरण हे प्रमुख जलस्रोत आहे.
-
उजनी धरणात सध्या केवळ साडेपाच टक्के पाणीसाठा उरलेला आहे.
-
उजनीमध्ये केवळ 3 टीएमसी जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे.
-
तीन दिवसांत उजनी धरण मृत साठ्यात जाण्याची शक्यता आहे.
-
सध्या उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये 6000 क्यूसेकने पाणी सोडले जात आहे.
-
त्यामुळे उजनी धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे.
-
या स्थितीमुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
