कळवण, ७ ऑक्टोबर – माझ्यावरती आमदारांचा दबाव होता म्हणून मी सत्तेमध्ये नाहीतर मला सत्तेमध्ये सहभागी व्हायचं नव्हतं असे स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले. तर अजित पवार यांची कळवण मध्ये असलेली सभा ही यशस्वी होऊ शकली नाही नागरिकांचा या सभेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी नाशिक दौऱ्यावरती होते. यावेळी त्यांनी कळवण मध्ये शेतकरी मेळावा घेतला या शेतकरी मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मी सत्तेमध्ये सहभागी होण्यास तयार नव्हतो. परंतु माझ्यावरती बरोबर आलेल्या आमदारांचा दबाव होता त्यांनी मला सत्तेमध्ये सहभागी होणार असतील तर पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे मी सत्तेमध्ये सहभागी झालो असे स्पष्ट मत व्यक्त करून ते पुढे म्हणाले की, मी विकास कार्य करावे आणि त्या माध्यमातून जनतेची सेवा करावी हाच माझा उद्देश आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. वेळप्रसंगी केंद्रात जाऊन हे प्रश्न सोडून आणेल आणि राज्यातील जनतेच्या विकास करेल हीच माझी भूमिका असल्याचे स्पष्ट करून अजित पवार पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कालही वचनबद्ध आहे. आजही वचनबद्ध आहे शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडणार नाही असे स्पष्ट भूमिका ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
चौकट
कळवण येथे असलेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शेतकरी मेळावा हा आमदार नितीन पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला होता. परंतु या मेळाव्याला कळवण मधील नागरिक तसेच कळवण देवळा सटाणा या भागातील शेतकऱ्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली. आजपर्यंत कधीही अजित पवार यांचा नाशिक मधील शेतकरी मेळावा हा अपयशी झाला नव्हता. पण हा मेळावा पूर्णपणे अपयशी झाला या मेळाव्यात जेमतेम शंभर ते दीडशे नागरिक उपस्थित होते. उर्वरित खुर्च्या या रिकाम्या होत्या यावरूनच अजित पवार यांना किती प्रतिसाद मिळत आहे हे स्पष्ट होते.
