नाशिक: ग्रॅज्युएट फार्मसी अप्टिट्यूड टेस्ट (जीपॅट) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आमदार देवयानी फरांदे व आमदार राहुल ढिकले यांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना साकडे. घातले आहे.
केंद्र सरकारने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टिट्यूड टेस्ट (जीपॅट) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना देण्यात येणारी विद्यावेतन (स्टायपेंड) अचानकपणे बंद केली आहे. त्यामुळे अनेक होतकरू व गरजु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक नुकसान होत आहे. पदव्युत्तर फार्मसीचा रिसर्च प्रोजेक्ट आणि इतर शैक्षणिक खर्च मोठा असतो, तो सर्वांना पेलला जात नाही. अशातच केंद्र सरकारने हि विद्यावेतन अचानकपणे बंद केल्याने राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील फार्मसी चे विद्यार्थी अडचणीत आले असल्याचे आमदार देवयानी फरांदे यांनी निवेदनात नमूद केले आहे .
गेल्या वर्षभरात शेकडो ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टिट्यूड टेस्ट (जीपॅट) पात्र उमेदवारांना स्टायपेंडपासून वंचित ठेवण्यात आले असल्याची माहिती दिल्यानंतर आपण ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टिट्यूड टेस्ट (जीपॅट) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले आहे.
