मुंबई उपनगर, ३ मे : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 28 -मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे.
28 – मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघातून आज सुरेंद्र महावीर सिबाग (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), दिलीप बापू बनसोडे (अपक्ष), दत्तात्रय अर्जुन उतेकर (भारतीय जवान किसान पार्टी), विद्या सतीश नाईक (अपक्ष), नरूद्दीन आफताब सय्यद (अपक्ष), संजू मारूती पवार (महाराष्ट्र विकास आघाडी), दौलत कादर खान (वंचित बहुजन आघाडी), प्रशांत ज्ञानेश्वर गंगावणे (देश जनहित पार्टी), मोहम्मद सिराज मोहम्मद इकबाल शेख (राष्ट्रीय ओलमा कौन्सिल) या नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
