लासलगाव, ८ ऑक्टोबर : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात साने गुरुजी (श्यामची आई) या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे,डॉ.सोमनाथ आरोटे तर प्रमुख पाहुणे म्हणून उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक उज्वल शेलार,किशोर गोसावी उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांनी साने गुरुजी यांनी लिहिलेले साहित्य,त्यांचे सामाजिक कार्य,इतिहास,तसेच त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित विविध उदाहरणे सांगून विद्यार्थ्यांना अनमोल अशा प्रकारचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
