सोलापूर, 8 ऑक्टोबर : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा तालुक्याच्या ठिकाणीच मिळाव्यात या हेतूने फेब्रुवारी २०२३ पासून प्रत्येक तालुक्यात ‘हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु करण्याचा निर्णय झाला.
सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यापासून दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर हे शहराजवळील तालुके वगळून उर्वरित नऊ तालुक्यांमध्ये हा दवाखाना सुरु झाला, पण अद्याप केवळ रुग्णांच्या तपासणीपुरतेच हे दवाखाने त्याठिकाणी असल्याची वस्तुस्थिती आहे.सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी, माढा (कुर्डुवाडी), माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला व करमाळा या नऊ तालुक्यांमध्ये आपला दवाखाना उघडण्यात आला आहे. आतापर्यंत मे ते सप्टेंबर या पाच महिन्यात आपला दवाखान्यांमध्ये त्या त्या तालुक्यातील २८ हजार ८६० रुग्णांनी वेगवेगळ्या पद्धतीची आरोग्य तपासणी करून घेतली आहे.
