राज्य शासन आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आणि अनुदानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी कृषी आणि पणन विभाग प्रयत्नशील आहे. पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत नियम २६० अन्वये प्रस्तावाला उत्तर देताना शेतमालाच्या हमीभाव, विकिरण प्रक्रिया केंद्रे, निर्यात धोरण, आठवडे बाजार अभियान, आणि संत्रा प्रक्रिया केंद्रे याबाबत माहिती दिली.
BulletsIn
- हमीभाव घोषित करणे केंद्र सरकारच्या अखत्यारित.
- 6 विकिरण प्रक्रिया केंद्रांपैकी 3 केंद्रांवर कांदा प्रक्रिया.
- समृद्धी महामार्गालगत कांदा महाबँक आणि प्रक्रिया प्रकल्प.
- निर्यातीभिमुख पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमांतर्गत प्रकल्प प्रस्ताव.
- सोयाबीन व कापूस उत्पादकांना अनुदान.
- तुरीचे आधारभूत दर निश्चित; तूर खरेदीसाठी नाफेडला निर्देश.
- बाजारभाव स्थिरीकरण योजनेंतर्गत खरेदीचा मॉडेल दर घोषित.
- कांदा निर्यात धोरण केंद्र सरकारशी निगडित.
- कांदा निर्यातीसाठी विविध देशांना परवानगी.
- शेतकरी आठवडे बाजार अभियान राबविण्याची घोषणा.
