सोलापूर, 6 ऑक्टोबर, ( हिं.स) जिल्हा हमाल मापाडी माथाडी श्रमजीवी कामगार समन्वय समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी कामगार आयुक्त कार्यालयावर हलगी मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लिलाव बंद ठेवण्यात आला होता.त्यामुळे बाजार समितीच्या आवारात सुकसुकाट पाहायला मिळाला.
गेल्या १० ते १५ वर्षांमध्ये शासनाने जिल्हा माथाडी मंडळाकडे अधिकारी, कर्मचारी यांच्या रिक्त जागी नवीन नेमणुका केलेल्या नाहीत. जिल्हा माथाडी मंडळाकडे निरीक्षक व कर्मचारी यांची नव्याने भरती करताना जिल्हा माथाडी मंडळाकडील नोंदणीकृत हमाल-तोलाईदार महिला माथाडी कामगारांच्या मुला-मुलींची प्राधान्याने भरती करणे सक्तीचे करावे व त्यांची भरती करावी, जिल्हा माथाडी मंडळ सक्षम होण्यासाठी स्थानिक माथाडी मंडळावर शासन नियुक्त हमाल व मालक प्रतिनिधी सदस्य यांच्या त्वरित नियुक्त्या कराव्यात, माथाडी बोर्डाकडे नवीन नोंदणी कामगारांसाठी नोंदणी करण्यासाठी पंढरपूर येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातील अर्ज माथाडी मंडळाकडे दाखल केले असून, अजूनपर्यंत त्यांची नोंदणी केली नाही.
हिंदुस्थान समाचार
