cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > आजच्या स्पर्धात्मक युगात आंतरभारतीची आवश्यकता, परिसंवादात वक्त्यांचा सुर
Regional

आजच्या स्पर्धात्मक युगात आंतरभारतीची आवश्यकता, परिसंवादात वक्त्यांचा सुर

CliQ INDIA
Last updated: February 5, 2024 10:18 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

सानेगुरूजी साहित्य नगरी,अमळनेर, (जि. जळगाव), 4 फेब्रुवारी : साने गुरुजी यांनी आंतरभारतीच्या माध्यमातून विद्यार्थ्याना अनेक भाषा शिकण्याची संधी दिली. विद्यार्थ्यांसाठी मूल्यशिक्षणासाठी उपक्रम राबविले. आजच्या स्पर्धात्मक युगात त्यांच्या आंतरभारतीची आवश्यकता असल्याचा सुर आंतरभारती काल-आज-उद्या या परिसंवादात उमटला.

खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी सभागृहात झालेल्या या परिसंवादाच्या अध्यक्षपदी डॉ. सुभाष किन्होळकर (धामणगाव बडे) हे होते. यात युवराज मोहिते (गोरेगाव), अमर हबीब( अंबाजोगाई), चंद्रकात भोंजाळ (अंधेरी), जयेश म्हाळगी (वडोदरा), डॉ. अलका कुलकर्णी (शहादा) यांनी सहभाग घेतला.

डॉ. अलका कुलकर्णी म्हणाल्या की, भारतीय खंड हा बहुभाषिक, बहुप्रांतीय, बहुसांस्कृतीक होता. त्यांचा बंधूभाव हाच धर्म होता.साने गुरुजी यांनी 1924 साली मुलांसाठी दैनिक काढल्यानंतर दिड वर्षांनी मुलांसाठी मासिक काढले. विद्यार्थ्यांना मूल्य शिकविण्याचे उपक्रम राबविले. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या गावाचा इतिहास शोधण्याचा सल्ला दिला. यातून त्यांनी स्थानिक प्रथा, परंपरा, इतिहास यामागील कारणमिमांसा केल्यास शेतकऱ्यांबद्दल बंधूभाव निर्माण होईल अशी गुरुजींची भूमिका होती. आंतरभारती संस्थेचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांना अनेक भाषा शिकण्याची संधी मिळाली. 17 मे 1950 साली साधनाच्या अंकांत आंतरभारतीची कल्पना मांडली व त्यासंदर्भांचा ठराव साहित्य संमेलनात पास करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

युवराज मोहिते म्हणाले की, भाषावर प्रांत रचना ही दुधारी तलवार आहे. आंतरभारती संस्था असती तर दोन राज्या राज्यांमध्ये वाद निर्माण झाला नसता. दहावी, बारावीतील मुले फ्रेंच, जर्मन यासारखे विषय घेतात. ते भारतीय भाषा घेऊ शकत नाही का असा प्रश्न उपस्थित केला. विद्यार्थ्यांना प्रांतावर भाषा शिकवा म्हणजे ते इतर राज्यात जावू शकतात असे मत मांडले.

अमर हबीब म्हणाले की, दोन समाजातील संवाद बंद करणाऱ्या भिंती उभारण्यात आले आहेत. गांधी पुसण्याचा उद्योग सुरू झाला आहे. गांधी समजून घेतल्या शिवाय देश समजून घेता येत नाही. गांधीमुळे देश एक झाला. आंतरजातीय विवाहांना मानवीय विवाह संबोधले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांत भोंजळ म्हणाले की, आंतरभारतीत विविधतेचा एकता पाहण्याचे सामर्थ्य आहे. मानसिक दुरावा कमी करण्यासाठी आंतरभारतीची गरज आहे. दुसऱ्या भाषेतील बेस्ट सेलर, वादग्रस्त पुस्तकांचे अनुवाद होत आहेत. यातून आंतरभारतीचे तत्त्व पुढे जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनुदानाकरीता धोरण ठरविले गेले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

युवराज मोहिते म्हणाले की, मानवी संस्कृतीचा उदय आदान प्रदानातून झाला आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी वेदांचे भाषांतर केले. साने गुरुजी यांनी पंढरपूर येथे केलेला मंदिर प्रवेश हा आंतरभारतीचा प्रयोग होता.

अध्यक्ष डॉ. सुभाष किन्होळकर म्हणाले की, साने गुरुजी यांनी स्वप्न साकार नाही झाले तर स्वप्नाचा पाठलाग करत जगत राहावे, हा संदेश दिला आहे. त्यांची दृष्टी ज्ञान, प्रांत, पक्षापुरती मर्यादित राहिली नाही. आंतरभारती नाविन्यपूर्ण विचार पेरणारी प्रेरणा आहे. आंतरभारती संकल्पनेचा विस्तार कसा होईल, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. भारतीयांत ऐक्य हवे. ऐकोपा, संमजस्यपणा आपापसातील वैर संपविते म्हणजेच आंतरभारती असल्याचे मत विषद केले.

 

You Might Also Like

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी कोल्हापूरातील मध्यवर्ती जागा निश्चित करावी – अजित पवार
‘पीएमपी’च्या ताफ्यात आणखी ५०० बस
ड्रग्ज प्रकरणाविरोधात नाशकात शुक्रवारी ठाकरे गटाचा मोर्चा, तयारी पूर्ण
पनवेल महापालिका पदभरती परीक्षा : परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
भाजपचे खासदार डॉक्टर कराड यांच्या निवासस्थानी गणरायाची स्थापना

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article लोकांचे जीवन सुलभ बनवण्याला सरकारचे प्राधान्य – पंतप्रधान
Next Article भंडा-यातील तुमसर तालुक्यात अवैध हातभट्टी दारूचा महापूर
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?