सोलापूर, 29 जून (हिं.स.)।
अकलूज येथील केंद्र बदल माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा जून / जुलै 2025 मध्ये होणा-या परीक्षेवेळी दिनांक 01 जुलै 2025 रोजी जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज येथे मुक्काम व रिंगण सोहळा आहे. त्याठिकाणी लाखों वारकरी भक्त जमा होतात, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, माळशिरस ता माळशिरस, जि. सोलापूर यांनी दिली. त्यामुळे दिनांक 30 जून 2025 ते 1 जुलै 2025 या दोन दिवसासाठी परिक्षेचे नियोजन बदलणेत आलेले आहे. सदर पत्राच्या अनुषंगाने त्यांनी दि. 30 जून 2025 ते 1 जुलै 2025 या कालावधीकरीता सदर परीक्षा केंद क्रमांक 3102 हे ठिकाण सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज याऐवजी कृष्णानंद विद्यामंदिर, पाटील वस्ती, (अकलूज) माळशिरस रोड, ता माळशिरस, जि सोलापूर या शाळेत परीक्षा केंद्रावर आयोजित करण्याबाबत पूर्ण नियोजन केलेले आहे. विभागीय सचिव, विभागीय मंडळ, पुणे यांनी याबाबत नियोजन करण्याबाबत कळविलेले आहे.तरी उपरोक्त शाळेच्या ठिकाणी कृष्णानंद विद्यामंदिर, पाटील वस्ती, (अकलूज) माळशिरस रोड, ता माळशिरस, जि सोलापूर 30 जून ते 1 जुलै या दोन दिवशी पोलिस बंदोबस्त बदलेल्या ठिकाणी देण्यात यावा. या नंतरचे सर्व पेपर मुळ सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज या ठिकाणीच होतील, अशी माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप यांनी दिली आहे.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड
