सोलापूर , 16 ऑक्टोबर (हिं.स.) : सोलापूर काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली असतानाच जिल्हाध्यक्षांनी मोठा खुलासा केला आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागात काँग्रेसचे दोन जिल्हाध्यक्ष नेमावे अशी मागणी शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी केली होती.यावरून ग्रामीण भागातील डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी व तालुकाध्यक्षकांनी तीव्र विरोध केला होता. पत्रकार परिषद घेऊन ग्रामीण भागातील तालुकाध्यक्षकांनी शहर अध्यक्षकांवर नाराजी व्यक्त केली होती. दोन जिल्हाध्यक्ष पदावरून शहर अध्यक्ष व जिल्हाअध्यक्ष असे दोन गट पडले आहेत.
सोलापूर काँग्रेसमध्ये दोन जिल्हाध्यक्ष पदावरून फूट पडते की काय असे चित्र निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील काँग्रेस नेत्यांनी थेट सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन शहर अध्यक्षकांना ताकीद द्यावी अशी मागणी केली आहे.
हिंदुस्थान समाचार
