लासलगाव, २२ नोव्हेंबर (हिं.स.) : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव व परिसरातील प्रवाशांच्या सहकार्याने यंदाच्या दिवाळीची लक्ष्मी लासलगाव बस आगाराला प्रसन्न झाली असून बारा दिवसात जवळपास 72 लाखाचे उत्पन्न मिळाले असल्याचे माहिती बस आगार व्यवस्थापक सविता काळे यांनी सांगितले.
यंदाचे वर्ष सुरुवातीला दुष्काळाचे सावट असल्याचे प्रथमदर्शनी जाणवत असताना मात्र नागरिकांनी दिवाळी उत्साहात साजरी केल्याने माहेर वाशिन मुळे उत्पन्नात वाढ झाल्याचे आढळून आले.या बारा दिवसात प्रवाशांच्या गर्दीमुळे एस टी बस 1 लाख 98 हजार 925 किलोमीटर धावल्याने जवळपास 72 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.मागील वर्षाच्या तुलनेत अकरा दिवसात 1 लाख 60 हजार 316 किलोमीटर बस धावून त्यात जवळपास 61 लाख 53 हजार 606 रुपये कमाई झाली होती.मागील वर्षाच्या तुलनेत महामंडळाने 10 लाख 26 हजार 907 रुपये दिवाळीच्या कमाईत वाढ झाल्याचे आढळून आले.
लासलगाव बस आगारात सध्या 42 बस गाड्या कार्यरत असून त्यात महामंडळाने चार नवीन बस गाड्या दिल्या परंतु त्या चार जुन्या बस गाड्या स्क्रॅप करण्यात आल्याने त्यामुळे कमी बस व तोकड्या कर्मचारी वर्गावर तारेची कसरत करून उत्पन्नात वाढ केली आहे.सध्या लासलगाव बस आगारात 87 चालक,76 वाहक व पंचवीस यांत्रिकी कामगार कार्यरत असून रोज 42 बस गाड्यामार्फत 242 फेऱ्यांमधून सतरा हजार पाचशे किलोमीटर अंतर कापतात यात प्रामुख्याने पुणे गाडी(कोळपेवाडी व निफाड),संभाजीनगर, नाशिक,धुळे, साक्री, चांदवड, निफाड,येवला,मनमाड या मार्गावर जादा फेऱ्या चालू आहे.
याबाबत लासलगावच्या आगार व्यवस्थापक सविता काळ यांनी सांगितले की, शासनाच्या ध्येय धोरणानुसार यंदा दिवाळीमध्ये चांगले उत्पन्न मिळाले त्यात चालक, वाहक व कामगार यांच्या एकत्रित मेहनतीमुळे सदर उत्पन्नात वाढ झाली आहे.सध्या नवीन बस साठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला असून लवकरच पुन्हा नवीन गाड्या सेवेत दाखल होतील असे काळे यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
