पुणे 6 नोव्हेंबर (हिं.स.) : दिल्लीतील महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्या भाजपच्या विरोधात आपली लढाई असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रीय सुळे यांनी केली. उत्तमनगर येथे रविवारी आयोजित जनसेवा उत्कर्ष स्वयंसहाय्यता बचत गटाच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात बोलात होत्या.
माझी लढाई वैयक्तिक कोणाशी नाही. महाराष्ट्राचा अपमान करतो, राज्याचे हित पाहत नाही, राज्यातील नेत्यांच्या आयुष्य उध्वस्त करतो, त्या प्रवृत्तीशी आहे. मराठी अस्मितेचा प्रश्न आहे, म्हणूनच ‘मेरी झांसी नही दूंगी’ तसे ‘मेरा महाराष्ट्र तुमको नही दूंगी’ असे सांगत माझी लढाई येथील चिनू मुन्नूशी नाही, तर दिल्लीतील महाराष्ट्र द्वेष असणाऱ्या भाजपच्या विरोधात आहे.’ अशी खरमरीत टीका सुप्रिया सुळे यांनी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष- घर फोडले. शरद पवारांचा पक्ष फोडला. नितीन गडकरींचे अधिकार कमी केले. देवेंद्र फडणवीस यांना दहा मार्कवरून अडीच मार्कावर आणले. अशाप्रकारे मराठी माणसांचा अपमान करणाऱ्या अदृश्य शक्तीच्या विरोधात लढाई सुरु आहे.
हिंदुस्थान समाचार
