cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > मध्य रेल्वेला एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत १२,४९७ कोटींचा विक्रमी महसूल प्राप्त
Regional

मध्य रेल्वेला एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत १२,४९७ कोटींचा विक्रमी महसूल प्राप्त

CliQ INDIA
Last updated: December 27, 2023 11:30 pm
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

मुंबई, 27 डिसेंबर (हिं.स.) – मध्य रेल्वेने एप्रिल ते नोव्हेंबर – २०२३ या कालावधीत रु. १२,४९७.४१ कोटींचा विक्रमी महसूल प्राप्त केला, जो एप्रिल ते नोव्हेंबर – २०२२ च्या एकूण रु. १०,८४८.८९ कोटींपेक्षा १५.२०% ने अधिक आहे. मध्य रेल्वेने आपल्या वाणिज्यिक महसुलात सातत्यपूर्ण सर्वोत्तम कामगिरी करण्याची आपली गती कायम ठेवलेली आहे.

मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ८ महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते नोव्हेंबर २०२३-२४ दरम्यान, रु. १२,४९७.४१ कोटींचा महसूल प्राप्त केला. हा महसूल मागील वर्षी रु. १०,८४८.८९ कोटी इतका होता, तो चालू वर्षात तुलनेने १५.२०% अधिकचा आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर-२०२३ या कालावधीत : मध्य रेल्वेने एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत १,०३९.२० दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली आहे, त्या तुलनेत एप्रिल ते नोव्हेंबर-२०२२ या कालावधीत ९४०.७८ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ १०.४६% इतकी मोठी आहे.

मध्य रेल्वेने एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत प्रवासी महसूल रु. ४६९९.१० कोटी प्राप्त केला. गतवर्षीच्या एप्रिल ते नोव्हेंबर-२०२२ मधील रु. ४०७७.६२ कोटी महसुलाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात १५.२४%ची मोठी वाढ झाली.

एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत वस्तू व सामानाच्या वाहतूकीचा महसूल रु. ६१४६.८३ कोटी इतका होता. एप्रिल ते नोव्हेंबर – २०२२ या कालावधीत हा महसूल रु. ५३८०.१५ कोटी होता, तुलनेने ह्यात १४.२५% ची वाढ झाली.

एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत, इतर कोचिंग, सामान, नॉन-फेअर महसूल तसेच विविध माध्यमांतून प्राप्त झालेला महसूल (विविध, पार्किंग, केटरिंग, विश्रामगृह, शौचालय वापर इत्यादीसह) रु.१६५१.४८ कोटी इतके आहे. गतवर्षी एप्रिल ते नोव्हेंबर – २०२२ कालावधीत प्राप्त झालेल्या रु.१३९१.१२ कोटी महसुलाच्या तुलनेत, तब्बल १८.७१% ची वाढ झाली.

नोव्हेंबर-२०२३ मध्ये : मध्य रेल्वेने नोव्हेंबर-२०२२ मध्ये १३०.७६ दशलक्ष प्रवाशी वाहतूक केली. नोव्हेंबर २०२३ मध्ये हाच आकडा १३१.५६ दशलक्ष इतका होता.

मध्य रेल्वेने नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रवासी महसूलातून रु. ५९५.५६ कोटी प्राप्त केले, मागील वर्षाच्या नोव्हेंबर-२०२२ कालावधीत हा आकडा रु. ५७०.८६ कोटी इतका होता.

नोव्हेंबर-२०२३ दरम्यान वस्तू आणि सामान वाहतूकीतून रु. ७८५.५१ कोटी इतका महसूल मिळाला. तोच नोव्हेंबर-२०२२ मध्ये रु.७८१.८३ कोटी होता.

नोव्हेंबर-२०२३ मध्ये इतर कोचिंग, सामान, नॉन-फेअर महसूल व इतर विविध महसूल (विविध, पार्किंग, केटरिंग, विश्रामगृह, शौचालये वापर इत्यादीसह.) रु. २०३.८२ कोटी प्राप्त केले. नोव्हेंबर-२०२२ च्या कालावधीत रु.१९१.८५ कोटी इतका होता.

मध्य रेल्वेने उत्पन्नाला चालना देण्यासाठी राबवलेल्या विविध उपक्रम, जसे की विभागांवर व्यवसाय विकास केंद्र (बीडीयू) स्थापन करणे तसेच इतर भाडे-व्यतिरीक्त महसूल उपक्रम आणि मुख्यालय कार्यालयातील विपणन व इतर तत्सम नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे महसूलात वाढ झालेली आहे.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

सोलापूरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उभारणार
पुणे : प्रदूषण मुक्तीसाठी जणजागृतीची गरज- दिलीप वळसे-पाटील
सोलापूर विद्यापीठाला जागतिक मानांक मिळवून देण्याचा प्रयत्न करणार- डॉ. प्रकाश महानवर
जालना ते छ. संभाजीनगर मार्ग दोन दिवस बंद राहणार
सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी नागरिकांनी सजग रहावे – प्रसाद देवरे | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article नाशकात तब्बल ३८ लाखांचा गांजा जप्त
Next Article नाताळानिमित्त शाळकरी विद्यार्थी पंतप्रधानांच्या घरी
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?