* आ. प्रविण दरेकर प्रमुख मार्गदर्शक
मुंबई, 16 डिसेंबर (हिं.स.) – भारतीय जनता पार्टी सहकार आघाडी, मुंबईतर्फे रविवार, १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वा. कोहिनुर मंगल कार्यालय, दादर (पूर्व) येथे भव्य सहकार मार्गदर्शन शिबीर आणि सहकार ‘निर्धार’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला भाजपा विधानपरिषद गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपा सहकार आघाडीचे अध्यक्ष आणि मेळाव्याचे आयोजक सुनील बांबूळकर यांनी दिली.
सहकार निर्धार मेळावा हा दोन सत्रात होणार आहे. पहिल्या सत्रात सहकार संस्थेची नोंदणी आणि सभासदांना मिळणारे लाभ, प्रगत काळात सहकारी संस्थांचे महत्व या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. तर दुसऱ्या सत्रात आमदार प्रविण दरेकर हे सहकार या विषयावर सहकार आघाडीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे भाजपा सहकार आघाडीच्या मुंबई विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही बांबूळकर यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार
