नाशिक, २८ डिसेंबर (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १२ जानेवारीला नाशिक मध्ये येत आहे त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने सुरक्षेसाठी केंद्रीय पथक देखील नाशिकमध्ये दाखल झालेले आहे दरम्यान या दौऱ्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याची चर्चा भाजप पराधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे दरम्यान या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या अधिवेशनापूर्वी भाजपा राज्यात लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात करणार हे आता स्पष्ट होत आहे.
नासिक मध्ये येत्या 12 जानेवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर येत आहे या दिवशी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवक केंद्रा द्वारा आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करणार आहे. त्यांच्या ज्या दौऱ्याच्या निमित्ताने सुरक्षतेच्या आढावा घेण्यासाठी म्हणून केंद्रीय पथक हे नाशिकमध्ये दाखल झाले असून ते तोपवनातील मोदी मैदान या ठिकाणच्या पाहणी दौरा केली तसेच ओझर विमानतळ आणि अन्य परिसराचा दौरा करून पोलीस अधिकाऱ्यांशी ते चर्चा केली.
दरम्यान दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा राजकीय दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचा आहे त्यामुळे प्रदेश भाजपाने या दौऱ्यावरती लक्ष केंद्रित केले असून भाजपाचे प्रदेश कार्यकारिणीचे काही नेते देखील नाशिकचा दौरा करणार आहे. असे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग देखील या दौऱ्याच्या निमित्याने फुंकले जाणार आहे की शक्यता असून त्या दृष्टिकोनातून नियोजन केले जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा यापूर्वीच निश्चित झाला होता त्यामुळे शिवसेना अधिवेशनाच्या आधी कोणतेही राजकीय नाट्य नसल्याचे देखील भाजपाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १२ जानेवारीला नाशिक मध्ये येत आहे तर २३ जानेवारीला शिवसेनेचे राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन हे नाशिक मध्ये होत आहे शिवसेना या अधिवेशनामध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे त्यापूर्वीच मोदी यांचा हा दौरा होत असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
हिंदुस्थान समाचार
