ठाणे, २० जानेवारी, (हिं. स)धार्मिक भावनेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने लोढा लक्झीरिया गृहनिर्माण संकुलातील दानशूर व्यापारी जेठामल व मनोजकुमार दुधाणी यांनी गृहसंकुलातील सफाई कर्मचारी घरकाम करणाऱ्या महिला, सुरक्षा रक्षक व आदी ५०० कर्मचाऱ्यांना गरम कपडे व दीप यांचे वाटप केले.
संपूर्ण देशभरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा साजरा केला जात आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. प्रभू रामचंद्रांच्या प्रेरणेने सामाजिक बांधिलकी लक्षात घेता लोढा लक्झीरिया येथील दानशूर व्यापारी जेटामल व मनोजकुमार दुधाणी यांनी संकुलातील ५०० कर्मचा-यांना गरम कपडे व दीप वाटप केले. गृहसंकुलातील सफाई कामगार, घरकाम करणाऱ्या महिला सुरक्षा रक्षक, बागकाम करणारे कर्मचारी अशांना उपयोगी वस्तूंचे वाटप केले. धार्मिक भावनेबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न यानिमित्ताने दुधाणी कुटुंबियांनी जपला.
हिंदुस्थान समाचार
