सोलापूर , 16 ऑक्टोबर (हिं.स.) : पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले असता भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने शाई फेकून चंद्रकांत पाटील यांना विरोध केला. खासगीकरणचा विरोध करत काळे झेंडे दाखवले. मोठा पोलीस बंदोबस्त असून देखील भीम आर्मीच्या अजय मैनदर्गीकर याने शाई फेकली.
स्थानिक पालकमंत्री हवा म्हणून यापूर्वीच चंद्रकांत पाटलांना सोलापुरात विरोध सुरू होता. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता. शासकीय विश्रामगृह येथे छावणीचे स्वरूप आले होते. खुद्द पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र माने यांनी कडेकोट सुरक्षा तैनात केली होती.मोठी सुरक्षा भिंत तोडून भीम आर्मीच्या अजय मैनदर्गीकर याने शाई फेकली. चंद्रकांत पाटलांचा पांढऱ्या शर्टवर शाई फेकल्याने एकच गोंधळ निर्माण झाला होता. पोलीस बंदोबस्त साठी असलेल्या पोलिसांनी ताबडतोब अजयला ताब्यात घेतले.त्यावेळी त्याच्या हातात काळे झेंडे होते.
हिंदुस्थान समाचार
