मुंबई, 4 डिसेंबर (हिं.स.) – कवयित्री वीणा विश्वास चव्हाण यांच्या अजूनही काही भावतं तिला या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली येथे ज्येष्ठ कवी, गीतकार प्रसाद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्यास सुप्रसिध्द लेखक, दिग्दर्शक राजेश देशपांडे, मोडीदर्पण या दिवाळी अंकाचे संपादक सुभाष लाड, ज्येष्ठ साहित्यिक अशोक लोटणकर, ज्येष्ठ कवयित्री योगिनी राऊळ आणि कवी, संपादक गीतेश शिंदे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच या प्रकाशन सोहळ्यास शुभेच्छा देण्यासाठी अभिनेते प्रफुल सामंत, अभिनेते, नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार व कवी संजय गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन दिनेश मोरे यांनी केले व नियोजन कवी विराज चव्हाण यांनी केले.
हिंदुस्थान समाचार
