अहमदनगर, 5 ऑक्टोबर(हिं.स.): अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी नगर ते मुंबई लॉंग मार्च सुरू झाला.त्यामुळे शहरातील नागरिकांचे विविध प्रश्न प्रलंबित पडले. याच बरोबर शहरातील साफसफाई ठप्प झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आ.संग्राम जगताप यांनी तातडीने मुंबई मंत्रालय गाठून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी केली.त्यानुसार उपमुख्य मंत्री अजित पवार यांनी 10 ऑक्टोबर रोजी मंत्रालय मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीसाठी आमदार संग्राम जगताप,वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन सेवा विभाग अप्पर मुख्य सचिव,नगर विकास विभाग ,प्रधान सचिव नियोजन विभाग. सामाजिक न्याय विभाग सचिव,नगरपालिका प्रशासन,संचालनालय नवी मुंबई संचालक,जिल्हाधिकारी अहमद नगर,महापालिका आयुक्त अहमदनगर,महानगरपालिका कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे,आनंद वायकर आदी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीमध्ये अहमदनगर महापालिका कर्मचाऱ्यांचा २०१६ पासून सातवा वेतन आयोग शिफारस लागू करण्याबाबत तसेच लाड समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगार वारसा हक्क पातळी मार्गी लावावा, याचबरोबर अहमदनगर महानगरपालिका आस्थापनावरील आकृतीबंध मंजूर असता ना देखील अधिकारी कर्मचाऱ्यांची भरती होत नाही या विषयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक लावण्यात आली आहे.अशा आशयाचे लेखी पत्र आ. संग्राम जगताप यांनी भाळवणी येथे जाऊन मनपा कर्मचारी युनिय नच्या पदाधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दिले.त्यामुळे युनियनच्या वतीने हा लॉंग मार्च स्थगित करण्यात आला असल्याची घोषणा यावेळी केली.
हिंदुस्थान समाचार
