नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या दिमाखदार विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी एक्स पोस्टवर लिहिले आहे, न्यूझीलंड विरुद्धच्या दिमाखदार विजयाबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन. हे सांघिक प्रयत्नांचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे, जिथे सर्वानी योगदान दिले आहे. मैदानावरची समर्पण वृत्ती आणि कौशल्य खरोखरच वाखाणण्याजोगे होते.
