cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांचा राजीनामा
National

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांचा राजीनामा

CliQ INDIA
Last updated: February 9, 2024 11:35 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

ट्विटरवर दिली काँग्रेस पक्ष सोडल्याची माहिती

मुंबई, 08 फेब्रुवारी  : काँग्रेसचे ज्येष्ठे नेते बाबा सिद्दिकी यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सिद्द्की यांनी ट्विटकरत आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी मिलींद देवरा यांनी पक्षत्याग करत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर तब्बल 48 वर्षे काँग्रेसमध्ये असलेल्या सिद्दीकी यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान सिद्दीकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. ते 1992 मध्ये पहिल्यांदा मुंबई महापालिकेत निवडून गेले. तसेच 1997 मध्येही ते पालिकेची निवडणूक जिंकले होते. त्यानंतर 1999 मध्ये मुबईतील वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 1999 मध्ये पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले. त्यानंतर 2004 आणि 2009 मध्ये त्यांनी विजय मिळवला. तसेच 2004 ते 2008 या कालावधीत ते राज्यमंत्री राहिले. आमदार होण्यापूर्वी ते दोन टर्म नगरसेवक होते. प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेल्या सिद्दीकी यांनी काँग्रेससोबतच प्रवास थांबवत असल्याबद्दलची माहिती सोशल मिडीयावर दिली.

आपल्या संदेशात सिद्दीकी म्हणाले की, ‘मी तरुणपणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सहभागी झालो होतो. तब्बल 48 वर्षांचा दीर्घ आणि महत्त्वाचा हा प्रवास होता. मात्र आज मी तातडीने काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मला खूप काही व्यक्त करायला आवडले असते, पण काही गोष्टींबाबत मौन बाळगणेच चांगले असल्याचे म्हटले जाते. माझ्या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो असे सिद्दीकी यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी विद्यमान आमदार आहे. झीशान अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. पण झीशान यांनी नाकारले होते. परंतु, अजित पवारांशी आपले सलोख्याचे संबंध आहेत. आपल्या कठीण काळात त्यांनी साथ दिल्याचे झीशान सिद्दीकी यांनी म्हटले होते त्यामुळे येत्या काळात झिशान आणि बाबा सिद्दीक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

You Might Also Like

भाजपाकडून बिहार निवडणुकीसाठी धर्मेंद्र प्रधानांची प्रभारी म्हणून नियुक्ती
देशाच्या किरकोळ महागाई दरात घसरण
अकोला दंगलीच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करा – सर्वोच्च न्यायालय
पुरी सागर किनाऱ्यावर ‘मेरा पहला वोट देश के लिये’ मोहिमेवरील वालुकाशिल्प
ललित मोदींनी IPL मॉडेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले; महसुलातील नुकसानीच्या दाव्यांमुळे स्पर्धेच्या स्वरूपातील आणि प्रशासनातील त्रुटी उघड — **ललित मोदींचे IPL मॉडेलवर प्रश्नचिन्ह; महसुलातील नुकसानीमुळे स्पर्धेतील त्रुटी उघड** **नवी दिल्ली:** इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) संस्थापक ललित मोदी यांनी स्पर्धेच्या महसुलातील नुकसानीच्या दाव्यांवरून IPL मॉडेलवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, या नुकसानीमुळे स्पर्धेच्या स्वरूपातील आणि प्रशासनातील संरचनात्मक त्रुटी उघड झाल्या आहेत. मोदी यांनी केलेल्या दाव्यांनुसार, IPL च्या महसुलात होणारी घट ही केवळ तात्पुरती समस्या नसून, ती स्पर्धेच्या मूळ रचनेत असलेल्या उणिवा दर्शवते. या उणिवांमध्ये स्पर्धेचे स्वरूप आणि प्रशासकीय व्यवस्थापन या दोन्ही बाबींचा समावेश आहे. या आरोपांमुळे IPL च्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात आणि त्याच्या व्यवस्थापनावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. महसुलातील घट रोखण्यासाठी आणि स्पर्धेला अधिक मजबूत करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article श्रीमद रामायण मालिकेत प्रभू श्रीरामांच्या प्रवासाचा पुढचा अध्याय सुरू
Next Article प्राचीन वारसा जतनाबाबत विद्यार्थीदशेतच जागृती करणे आवश्यक : सतीश लळीत
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?