cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > प्राचीन वारसा जतनाबाबत विद्यार्थीदशेतच जागृती करणे आवश्यक : सतीश लळीत
Regional

प्राचीन वारसा जतनाबाबत विद्यार्थीदशेतच जागृती करणे आवश्यक : सतीश लळीत

CliQ INDIA
Last updated: February 9, 2024 11:36 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

* निलंगा येथे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

लातूर, ८ फेब्रुवारी  : ऐतिहासिक वारसा जपणे हे प्रत्येकाचे वैयक्तिक आणि समाजाचे सामूहिक कर्तव्य आहे. भावी पिढ्यांसाठी हा वारसा जपून त्याचे संरक्षण करण्यासाठी विद्यार्थीवयातच जागृती निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांनी निलंगा येथे नुकतेच केले.

लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय पुरातत्व परिषद नुकतीच झाली. या परिषदेत श्री. लळीत यांना साधनव्यक्ती म्हणून निमंत्रित करण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी ‘कोकणातील कातळशिल्पे आणि त्यातील काही संकल्पना’ या विषयावर सविस्तर सादरीकरणही केले.

या परिषदेचे उद्घाटन भारतीय इतिहास संशोधन परिषद, नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. अरविंद जामखेडकर यांच्याहस्ते झाले. महाराष्ट्र महाविद्यालय, इतिहास विभाग व भारतीय सामाजिक शास्त्रे संशोधन परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ही दोन दिवशीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत पोळ, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, परिषदेचे संयोजन सचिव डॉ. सुभाष बेंजलवार उपस्थित होते.

संशोधन हा शिक्षणाचा एक भाग आहे. दुसऱ्यात योग्यता निर्माण करणे म्हणजे शिक्षण. अशा प्रकारचे संशोधन होताना परंपरा, प्रतिमा यातील विज्ञान समजून घेतले तरच मूर्तीचा अभ्यास करता येईल, असे मत डॉ. जामखेडकर यांनी यावेळी व्यक्त केले.

डॉ जामखेडकर म्हणाले, नाणे ही प्रतिमा वा मुद्रा आहे; पण ते ज्याच्या हातात पडेल, तो त्याचा वेगवेगळा अर्थ लावून वापर करतो. त्याने लावलेला हा वेगवेगळा अर्थ समजून घेऊनच संशोधन केले पाहिजे. उत्तर भारताच्या संदर्भात मूर्ती, शिल्प, लेणी, स्तूप, चैत्यगृह याबाबतीत भरपूर ऐतिहासिक मांडणी झालेली आहे. दक्षिण भारताच्या बाबतीत अशी मांडणी झाल्याचे प्रमाण फार कमी आहे, ते डोळ्यासमोर ठेवून या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.

श्री. लळीत यांनी सादरीकरणात कोकणातील कातळशिल्पांची संकल्पना स्पष्ट करुन सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले की, पुरातत्वशास्त्रामध्ये सर्वेक्षण, संशोधन, उत्खनन आणि अर्थान्वयन याला खुप महत्त्व आहे. कोकणातील कातळशिल्पांचे अर्थान्वयन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. युनेस्कोने कोकणातील आठ गोव्यातील एक अशा नऊ कातळशिल्पांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या प्राथमिक यादीत समावेश करुन याच्या प्राचीनत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र या प्राचीन वारशाचे जतन हा आज कळीचा मुद्दा ठरला आहे. याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. आपल्या सादरीकरणात श्री. लळीत यांनी कातळशिल्पांच्या काही प्रतिमांमध्ये आढळलेल्या मातृदेवता संकल्पनेचा मागोवा घेतला.

यावेळी श्री. निलंगेकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. राहुल वरवंटीकर, मूर्तीकलेचे अभ्यासक डॉ. अरविंद सोनटक्के यांची भाषणे झाली.

प्राचार्य डॉ. माधव कोलपुके यांनी परिषदेसाठी आलेल्या प्रमुख उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेचे संयोजन सचिव डॉ. सुभाष बेंजलवार यांनी केले. आभार डॉ. भास्कर गायकवाड यांनी मानले.

या परिषदेत दीडशेहून अधिक संशोधक, विद्यार्थी सहभागी झाले होते. एकंदर चार सत्रांमध्ये संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले. निलंगा येथील प्रसिद्ध निळकंठेश्वर मंदिर आणि खरोसा लेणी येथे अभ्यास सहलही आयोजित करण्यात आली होती.

You Might Also Like

मेळघाटमध्ये शासनाच्या ज्वारी खरेदीत गोंधळ ! शेतकऱ्यांची फरफट, तीन महिन्यांनंतर माल परत
सोलापूर : नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण , डेमु सेवासह रेल्वेस थांबा देण्याची मागणी
अमरावतीसाठी भाजपचा प्लान बी तयार; नव्या उमेदवारांची चाचपणी सुरु
शहापूरजवळ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या तीन बसचा अपघात, २५ जखमी
वैभव ढाकणे यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचे चांगले काम केले – आ.संग्राम जगताप

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांचा राजीनामा
Next Article सोलापुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणास सात वर्षे सक्तमजुरी
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?