उत्तराखंड पोलिसांनी दिल्लीतून आवळल्या मुसक्या
नवी दिल्ली, फेब्रुवारी : उत्तराखंडच्या हल्द्वानी येथे 8 फेब्रुवारी रोजी घाडवण्यात आलेल्या हिंसाचाराचा सूत्रधार अब्दुल मलिक याला आज, शनिवारी दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर मलिक फरार झाला होता.
उत्तराखंडच्या हल्द्वानीमधील बनभूलपुरा येथे 8 फेब्रुवारी रोजी अवैध मदरसा आणि मशिदी हटवण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन पथक गेले असता मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. यात महापालिकेच्या 2.44 कोटी रुपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले. हा अवैधन मदरसा व मशिद अब्दुल मलिकच्या ताब्यात होते. त्यामुळे महापालिकेने त्याला नुकसानभरपाईची नोटीस पाठवली. पण नोटीसला काहीही उत्तर देण्यात आले नाही. आता तहसीलच्या माध्यमातून वसुलीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तहसीलदार सचिन कुमार यांनी सांगितले की, वसूलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या 7 दिवसांची नोटीसला उत्तर न मिळाल्यास अचल मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे. दरम्यान हिंसाचाराच्या घटनेनंतर अब्दुल मलिक फरार होता. उत्तराखंड पोलिसांनी शनिवारी दिल्ली येथून त्याला अटक केलीय.
