रत्नागिरी, फेब्रुवारी, : रत्नागिरीत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पुन्हा एकदा अमली पदार्थ विरोधी धडक कारवाई सुरू केली आहे. रत्नागिरी शहरातील शिवखोल येथे ही कारवाई झाली असून ८० हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
महम्मद जैनुद्दीन वस्ता (४२) हा अमली पदार्थ बाळगणाऱ्या संशयिताचे नाव आहे. या कारवाईत ४ ग्रॅम ब्राऊन शुगर, ११ ग्रॅम गांजा आणि रोख रक्कम असा ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रत्नागिरी शहरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अमली पदार्थ सेवन करणारे, विक्री करणारे यांच्यावर नजर ठेवून आहे. असा कोणी सापडल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आकाश साळुंखे यांनी सांगितले.
