गृहमंत्र्यांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी कारवाई
नवी दिल्ली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बनावट व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना समन्स पाठवले आहे. तसेच त्यांना बुधवारी 1 मे रोजी चौकशीसाठी बोलावले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तेलंगणातील नियमबाह्य मुस्लिम आरक्षण संपवण्याचे वचन दिले होते. परंतु, त्यांच्या व्हिडीओत छेडछाड करून अमित शाह देशातील एससी, एसटी आणि ओबीसीचे आरक्षण संपवू इच्छीतात असे दर्शवत तो बनावट व्हिडीओ सोशल मिडीतात व्हायरल करण्यात आला. गृहमंत्र्यांनी तेलंगणातील मुस्लिमांचे आरक्षण संपविण्याचे वचन दिले होते, परंतु ते सर्व वर्गांचे आरक्षण संपविण्याबाबत बोलत असल्याचे व्हिडीओत पाहून लोकांमध्ये संभ्रम आणि गोंधळ निर्माण झाला. फेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गृहमंत्र्यांकडून दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी आयपीसीचे कलम 153, 153-ए, 465, 469 आणि 171 जी तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम (आयटी-ऍक्ट) 66-सी अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तसेच दिल्ली पोलिसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना समन्स पाठवले आहे. तसेच त्यांना बुधवारी 1 मे 2024 रोजी चौकशीसाठी बोलावले आहे.
