मुंबई, 03 फेब्रुवारी (हिं.स.)। उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान अजित पवार यांच्याकडे असलेल्या पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. याबाबत, सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी केले आहे.
उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर केवळ अर्थ खाते वगळून अजित पवारांकडे असलेल्या सर्व खात्यांची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. यामध्ये राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण तसेच अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभाग या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
