चंद्रपूर, – महाराष्ट्राच्या सत्तेत परिवर्तन घडवून आणणारे, राज्याला हिरवेगार करणारे आणि चंद्रपूरचा चौफेर विकास साधणारे सुधीर मुनगंटीवार हे नेतृत्व-वक्तृत्व्–कर्तृत्व याचा तिहेरी संगम असून त्यांना ऐतिहासिक मतांनी विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर मतदारसंघातील जनतेला केले. दरम्यान चंद्रपूरचे मुलुख मैदान गाजवणा-या सुधीर मुनगंटीवार यांची तोफ आतापर्यंत मुंबईत धडकत होती आता ती दिल्लीत धडकणार आहे, अशा आशावादही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गांधी चौकात आयोजित करण्यात आलेल्या सभेला ते संबोधित करत होते. यावेळी मंचावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खा. हंसराज अहिर, खा. रामदास तडस, आ. संदीप धुर्वे, आ. संजीव रेड्डी बोदकुरवार, आ.अशोक उईके, आ. महेश बालदी, आ. प्रशांत ठाकूर, माजी आमदार आशीष देशमुख, संजय धोटे, सुदर्शन निमकर,भाजपा ज्येष्ठ नेते चंदन सिंग चंदेल,भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे मित्र पक्षातील सर्व पदाधिकारी व हजारो भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने संपूर्ण देशातून त्यांना मानवंदना मिळवून दिली. इंग्रजांनी चोरून नेलेली ऐतिहासिक छत्रपतींची वाघनखे परत आणण्याासाठी धडपड केली. अशा अनेक अस्मितेच्या मानकांसंदर्भात त्यांनी उत्तम काम केले आहे. त्यांनी विकासाची गंगा आणून चंद्रपूरचा चेहेरामोहरा बदलला आहे. चंद्रपूरचे मुलुख मैदान गाजवणा-या सुधीर मुनगंटीवार यांची तोफ आतापर्यंत मुंबईत धडकत होती, आता ती दिल्लीहत धडकणार आहे, अशा आशावाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
तुलना करायचीच असेल तर विकासाची, प्रगतीची करा. मी आजपर्यंत दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण केला आहे. मी जर निवडून आलो तर नवकल्पनांच्या, माध्य मातून वार्ड, प्रभाग, गाव, शहर यांच्या विकासासाठी पूर्ण शक्तिनिशी प्रयत्न करील. तुमचा आशीर्वाद मला भारताला भूकमुक्त, आतंकमुक्त्, विकासयुक्त तसेच भारताच्या गौरव वाढविण्यासाठी पाहिजे आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.
मुनगंटीवारांना ऐतिहासिक विजय प्राप्त करून द्या :- चंद्रशेखर बावनकुळे
सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थशास्त्र कळते, त्यांना महाराष्ट्राची नाळ कळते. आतापर्यंत हंसराज अहीर यांनी चंद्रपूरचा विकास केला. त्याच्या दहापट विकास विकास करायचा असेल तर सुधीर मुनगंटीवार हा एकमेव नेता आहे. सर्वांनी एकत्र येऊन सुधीर भाऊंना ऐतिहासिक विजय प्राप्त करून द्यावा, असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
