काँग्रेसच्या स्थापना दिवस मेळाव्याला गैरहजर
नागपूर, 28 डिसेंबर (हिं.स.) : काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त आज, गुरुवारी नागपुरात मोठा मेळावा आहे. यासाठी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नागपूरला पोहचलेत. परंतु, खासदार सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियंका वाड्रा यांचा दौरा रद्द झालाय. नागपूर मेळाव्यात या दोन्ही नेत्या उपस्थित राहणार नसल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातून काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहे. पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त ‘है तयार हम’ या रॅलीने निवडणूक प्रचाराची सुरुवात करत आहेत. नागपुरातील उमेरड पक्षाची महासभा आहे. या कार्यक्रमासाठी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसच्या सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या महासभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश नाना पटोल हे संबोधित करणार आहेत. काँग्रेसच्या या मेगा रॅलीमध्ये सुमारे 10 लाख लोक सहभागी होतील असा काँग्रेसचा दावा आहे. या मेळाव्यात सार्वत्रिक निवडणुकीची थीम आणि मुद्दे जाहीर होण्याची शक्यता आहे. मेगा रॅलीनंतर काँग्रेस अध्यक्ष खरगे सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारींसोबत बैठक घेणार असून, त्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हिंदुस्थान समाचार
