cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > समुद्र म्हणजे जागतिक स्पर्धेसाठी उदयास येत असलेली नवीन आघाडी – उपराष्ट्रपती
National

समुद्र म्हणजे जागतिक स्पर्धेसाठी उदयास येत असलेली नवीन आघाडी – उपराष्ट्रपती

CliQ INDIA
Last updated: November 16, 2023 6:00 pm
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

* संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला न्याय्य प्रतिनिधित्व द्यावे

, 16 नोव्हेंबर (हिं.स.) : स्वतःत दडलेल्या अफाट साधनसंपत्तीमुळे, समुद्र म्हणजे जागतिक स्पर्धेसाठी उदयास येत असलेली नवीन आघाडी आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने या साधनसंपत्तीवर आपापला हक्क दाखवण्याच्या स्पर्धेतून निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य तंट्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, परिणामकारक नियमन व्यवस्था आणि तिच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज आहे, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अधोरेखित केले.

नवी दिल्लीत आयोजित, हिंद-प्रशांत क्षेत्रीय संवाद-2023 मध्ये बोलत होते. जगातील वेगाने विकसित होत असलेली अर्थव्यवस्था असल्यामुळे, खुल्या आणि मुक्त, कायदेशीर अधिकृत व्यापाराने परिपूर्ण असलेले, नियमाधारित आणि शांततापूर्ण हिंद-प्रशांत क्षेत्र भारताला हवे आहे असे उपराष्ट्रपती म्हणाले.

भारत म्हणजे,जागतिक शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करणारी आघाडी म्हणून उदयास येत असलेली अर्थव्यवस्था, असे वर्णन करत उपराष्ट्रपतींनी, जागतिक सुव्यवस्था राखण्यासाठी जागतिक नेतृत्व करण्याच्या दृष्टीने, भारताने महत्त्वपूर्ण आणि विधायक भूमिका बजावायला हवी, यावर त्यांनी भर दिला.

इतर सर्व राष्ट्रे एकत्र आली तरच एखाद्या बलाढ्य राष्ट्राची हाव आटोक्यात राहू शकते हे अधोरेखित करून धनखड म्हणाले की सहयोगात्मक सुरक्षा आणि नवोन्मेषी भागीदारी हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे. “हाच एकमेव मार्ग आहे. कोणताही देश एकटा उभा राहू शकत नाही, त्यासाठी एकत्रितपणे कृती करावी लागेल,” असे त्यांनी जोर देऊन सांगितले.

जागतिक लोकसंख्येचा एक षष्ठांश भाग असलेल्या भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत (UNSC) योग्य ते प्रतिनिधित्व मिळालेले नाही आणि त्यामुळे या जागतिक संघटनेची कार्यक्षमता नक्कीच घटते अशा शब्दात उपराष्ट्रपतींनी आपल्या भाषणात आपली वेदना आणि व्यथा देखील व्यक्त केली. महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

हिंद-प्रशांत क्षेत्रामधील व्यापार आणि संपर्क व्यवस्थेची सुरळीत देखभाल विस्कटू शकेल अशा टांगती तलवार असलेल्या अनेक परिस्थितींसह जागतिक स्फोटक परिस्थितीचा सामना आपल्याला करावा लागत आहे,असे निरीक्षणही त्यांनी हिंद-प्रशांत क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करताना नोंदवले.

कितीही आधुनिक प्रगती झाली तरी नकली निर्मिती-चाचेगिरी(पायरसी) आणि अंमली पदार्थांची तस्करी हे अजूनही आपल्यासमोरील एक मोठे आव्हान आहे असे नमूद करत धनखड यांनी हे लक्षात आणून दिले की या अवैध धंद्यातून निर्माण होणाऱ्या संपत्तीचा वापर, राजकीय पाठबळ असलेल्या आंतरराष्ट्रीय समाजविघातक शक्तींकडून शांतता आणि सौहार्द बिघडवण्यासाठी होत असतो. जागतिक शांततेच्या प्रयत्नांमध्ये अडथळा आणणारे सर्वात मोठे विध्वंसक म्हणून या राजकीय पाठबळ असलेल्या आंतरराष्ट्रीय समाजविघातक शक्ती उदयास आल्या आहेत. त्यांना निष्क्रीय करण्यासाठी वैयक्तिक प्रयत्न पुरेसे ठरु शकणार नाहीत. केवळ एकजुटीने, तसेच खंबीर आणि निर्णायक यंत्रणे द्वारेच, त्यांचा सामना करता येऊ शकतो”, असे मतही उपराष्ट्रपतींनी नोंदवले.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

आंध्रप्रदेश : ट्रक अपघातात 7 जणांचा मृत्यू | BulletsIn
लोकांचे जीवन सुलभ बनवण्याला सरकारचे प्राधान्य – पंतप्रधान
जागतिक भारतीय सागरी परिषदचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
परस्परसंबंधित त्रिकूट: भारतातील हवामान-लवचिक शेतीसाठी जंगले, पाणी आणि कृषी खाद्य प्रणाली
पंतप्रधान मोदी १ ऑगस्टला सोलापूर दौऱ्यावर | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोलीतील सीआयआयआयटी केंद्राचे लोकार्पण
Next Article सोलापूर : डिसेंबरमध्ये पार्क स्टेडिअमवर रणजी सामने
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?