नौदलाने शेअर केला सुटका झालेल्या भारतीयांचा व्हिडीओ
नवी दिल्ली, 06 जानेवारी (हिं.स.) : सुमद्री चाच्यांनी अपहरण केलेल्या ‘एमव्ही लीला नॉरफोक’ या जहाजातील 15 भारतीयांसह 21 अपहृतांची शुक्रवारी भारतीय नौदलाने सुखरूप सुटका केली. त्यानंतर सुटका झालेल्या 21 जणांनी “भारत माता की जय” अशा घोषणा देत नौदलाचे आभार मानलेत. यासंदर्भात नौदलाने व्हिडीओ जारी केलाय.
नौदलाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्कये सुटका करण्यात आलेल्या लोकांचा आनंद स्पष्टपणे दिसकून आला. सकुटका झालेले अपहृत “भारत माता की जय”च्या घोषणा देत भारतीय नौदलाच्या जवानांचे आभार मानताना दिसलेत. भारतीय नौदलाचा आम्हा सर्वांना अभिमान वाटत असल्याचे एका व्यक्तीने सांगितले. त्यानंतर सर्वांनी एकोप्याने ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. सोमालियाच्या सागरी किनाऱ्याजवळ भारतीय मालवाहू जहाजाचे अपहरण केले. याची माहिती मिळताच नौदलाचे गस्ती विमान आणि लांब पल्ल्याचा ‘प्रेडेटर-एमक्यू-9बी’ ड्रोन तैनात करण्यात आला. तसेच नौदलाच्या आयएनएस चेन्नई या जहाजाने शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता अपहृत जहाजाला घेरले. भारतीय नौदलाच्या मार्कौस कमांडोंना पाहताच सोमालियन चाच्यांनी पळ काढला. भारतीय नौदलाना अपहृत जहाजाची तपासणी केले असता एकही समुद्री लुटारू आढळून आला नाही.. सध्या भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस चेन्नई नॉरफोकजवळ एमव्ही लीला या मालवाहू जहाजासह उपस्थित आहे. जहाजाला पुढील बंदरात प्रवास सुरू करण्यास मदत करण्यासाठी वीज निर्मिती आणि नेव्हिगेशन सिस्टमवर पुनर्संचयित केले जात आहे. जहाजाचे मालक लीला ग्लोबलचे मुख्य कार्यकारी स्टीव्ह कुंजर यांनी भारतीय नौदलाचे आभार मानले आहेत.
हिंदुस्थान समाचार
