स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाण्याद्वारे टीका केली होती. या प्रकरणानंतर राज्यातील विविध ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याने त्याला फोन करून धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी कामराला पाठिंबा दर्शवताना एक मिश्किल पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
BulletsIn
-
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाण्याद्वारे टीका केली होती.
-
या टीकेनंतर राज्यातील अनेक ठिकाणी कामरावर गुन्हे दाखल करण्यात आले.
-
शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याने कामराला फोन करून धमकी दिली.
-
फोनवर कामराने सांगितले की तो सध्या तामिळनाडूमध्ये आहे.
-
यावर त्या कार्यकर्त्याने “तामिळनाडू कसं पोहोचायचं भाऊ?” असा प्रश्न विचारला.
-
ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यावर अनेक मिम्स तयार झाले.
-
प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी या प्रकरणावर मिश्किल प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर फोटो शेअर केला.
-
प्रकाश राज यांनी कुणाल कामरासोबतचा फोटो पोस्ट करत “तामिळनाडू कसं पोहोचायचं भाऊ? – सिम्पल, ऑटोने” असं खोचक कॅप्शन दिलं.
-
प्रकाश राज आणि कामरा यांनी एकसारख्या रंगाचा शर्ट घातल्याने फोटोही लक्षवेधी ठरला.
-
कुणाल कामरा याने स्पष्ट केले आहे की, तो माफी मागणार नाही आणि तो सोशल मीडियावर आपली बाजू मांडत राहील.
