मुंबई, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे पुढील विशेष गाड्यांची मुदत वाढवणार आहे:
ट्रेन क्र.०२१३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर दि. २०.११.२०२३ पर्यंत द्वि-साप्ताहिक विशेष अधिसूचित आता दि. २८.१२.२०२३ (११ फेऱ्या) पर्यंत धावण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्रमांक ०२१४० नागपूर -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. २१.११.२०२३ पर्यंत आता दि. ३०.१२.२०२३ (११ फेऱ्या) पर्यंत धावण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
अतिरिक्त थांबे: चाळीसगाव आणि जळगाव
ट्रेन क्र. ०२१४४ नागपूर – पुणे साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. १६.११.२०२३ पर्यंत आता दि. २८.१२.२०२३ (६ फेऱ्या) पर्यंत धावण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्रमांक ०२१४३ पुणे -नागपूर साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. १७.११.२०२३ पर्यंत आता दि. २९.१२.२०२३ (६ फेऱ्या) पर्यंत धावण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्रमांक ०११२७ लोकमान्य टिळक टर्मिनस -बल्हारशाह साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. २८.११.२०२३ पर्यंत आता दि. २६.१२.२०२३ (४ फेऱ्या) पर्यंत धावण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्रमांक ०११२८ बलहारशाह – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. २९.११.२०२३ पर्यंत आता दि. २७.१२.२०२३ (४ फेऱ्या) पर्यंत धावण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्र. ०१४३९ पुणे – अमरावती द्वि-साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. ०१.१२.२०२३ पर्यंत आता दि. ३१.१२.२०२३ (९ फेऱ्या) पर्यंत धावण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
गाडी क्रमांक ०१४४० अमरावती-पुणे द्वि-साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. ०२.१२.२०२३ पर्यंत आता दि. ०१.०१.२०२४ (९ फेऱ्या) पर्यंत धावण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
वर नमूद केलेल्या गाड्यांच्या वेळा, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक ०२१३९/०२१४० च्या सर्व विस्तारित सेवांचे विशेष शुल्कासह बुकिंग त्वरित उघडले जाईल आणि विशेष ट्रेन क्रमांक ०२१४४/०२१४३, ०११२७/०११२८ आणि ०१४३९/०१४४० विशेष शुल्कासह दि. २३.११.२०२३ रोजी सर्व संगणकीकृत केंद्रावर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडतील.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.
प्रवाशांनी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार
