आयझवाल, 24 ऑक्टोबर (हिं.स.) : मणिपूरमध्ये सुरु असलेल्या मैतेयी- कुकी जमातींच्या संघर्षात चर्च पेटवल्यामुळे मिझोरामचे मुख्यमंत्री झोरमथांगा संतप्त झाले आहे. निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदींसह स्टेज शेअर करणार नसल्याची घोषणा त्यांनी केलीय.
यासंदर्भात मुख्यमंत्री झोरमथांगा यांनी सांगितले की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी येथे आल्यावर त्यांच्यासोबत स्टेज शेअर करणार नाही.पंतप्रधानांनी येथे एकटे येऊन मंचावर एकट्याने आपले विचार मांडले तर बरे होईल. यानंतर मी स्वतंत्रपणे मंचावर येईन असे झोरमथांगा म्हणालेत. तसेच मिझोरामचे लोक ख्रिश्चन असून मणिपूरमध्ये चर्च जाळले, तेव्हा मिझोरामच्या सर्व लोकांनी निषेध केला. यावेळी भाजपबद्दल सहानुभूती दाखवणे हा माझ्या पक्षासाठी मोठा मायनस पॉइंट असेल. मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत, ज्याचे निकाल 3 डिसेंबरला येतील. निवडणुकीपूर्वी, 30 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ रॅली काढण्यासाठी पश्चिम मिझोराममधील मामित गावात येऊ शकतात.झोरामथांगाचा पक्ष मिझो नॅशनल फ्रंट हा भाजपच्या नेतृत्वाखालील नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्स आणि केंद्रातील सत्ताधारी एनडीएचा सदस्य आहे. तथापि, मिझोराममध्ये एमएलएफ भाजपपेक्षा वेगळा आहे. सीएम जोरमथांगा म्हणाले की, त्यांचा पक्ष एनडीए आणि एनईडीएमध्ये सामील झाला कारण तो काँग्रेसच्या विरोधात आहे. आम्ही कोणत्याही काँग्रेस आघाडीचा भाग होऊ इच्छित नाही.
म्यानमार, बांगलादेश आणि मणिपूरमधील लोकांना आश्रय देण्याच्या प्रश्नावर जोरमथांगा म्हणाले की, मणिपूर सरकार केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल टाकत आहे. ते म्हणाले की, भारत सरकारने तत्कालीन पाकिस्तानच्या (आताचा बांगलादेश) निर्वासितांना आश्रय दिला होता आणि त्यांच्याकडे शस्त्रेही दिली होती, जेणेकरून स्वातंत्र्य लढा जिंकता येईल. आम्ही म्यानमारच्या निर्वासितांना शस्त्रे देत नाही. आम्ही त्यांना फक्त मानवतेची बाब म्हणून अन्न आणि निवारा देतो. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करणे ही केंद्राची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
