तिरुचिरापल्ली, 02 जानेवारी (हिं.स.) : भारतीदासन विद्यापीठाची सुरुवात मजबूत आणि परिपक्व पायावर झाल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठाच्य 38 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी राज्यपाल आरएन रवी आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन प्रामुख्याने उपस्थित होते.
भारतीदासन विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना पंतप्रधान म्हणाले की, नवी नवर्षातील (2024 मधील) हे माझे पहिले सार्वजनिक भाषण आहे. मला तामिळनाडूसारख्या सुंदर राज्यात आणि तरुणांमध्ये आनंद वाटतो. दीक्षांत समारंभासाठी येथे येण्याचे सौभाग्य मिळालेला मी पहिला पंतप्रधान आहे हे जाणून मलाही आनंद झाला आहे. या महत्त्वाच्या प्रसंगी मी सर्व पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो. येथील प्रत्येक पदवीधर 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्यात योगदान देऊ शकतो. आगामी 2047 हे वर्ष आपल्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचे वर्ष बनवण्यासाठी तरुणांचे योगदान देण्याच्या क्षमतेवर मला विश्वास असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
गेल्या 10 वर्षांत देशातील विमानतळांची संख्या 74 वरून दुप्पट होऊन सुमारे 150 झाली आहे. तामिळनाडूला सक्रीय सागरी किनारपट्टी लाभली आहे. त्यामुळे तुम्हाला हे जाणून आनंद होईल की भारतातील प्रमुख बंदरांची एकूण कार्गो हाताळणी क्षमता 2014 पासून दुप्पट झाली आहे.पंतप्रधानांच्या हस्ते तिरुचिरापल्ली येथे विमान वाहतूक, रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू, शिपिंग आणि उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित 19 हजार 850 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी कार्यक्रम प्रस्तावित आहे.
हिंदुस्थान समाचार
