नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर (हिं.स.) : उत्तराखंड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
देवभूमी उत्तराखंडने भारतीय संस्कृती आणि परंपरा समृद्ध करण्यात अमूल्य योगदान दिले असल्याचे, पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी X पोस्टमध्ये म्हटले आहे; ”भारतीय संस्कृती आणि परंपरा समृद्ध करण्यात देवभूमी उत्तराखंडचे अमूल्य योगदान आहे. निसर्गपर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या राज्यातले माझे सर्व कुटुंबीय अत्यंत कष्टाळू आणि पराक्रमीदेखील आहेत. आज या राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा.”
हिंदुस्थान समाचार
