नवी दिल्ली, 22 डिसेंबर (हिं.स.) – देशभरातील 13 विमानतळांवर डिजी यात्रा कार्यान्वित केली आहे. तसेच भविष्यात इतर विमानतळांवर ही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार आहे, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्रालयाचे राज्यमंत्री जनरल (डॉ.) व्ही. के. सिंग (निवृत्त) यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
काय आहे डिजी यात्रा सुविधा
विमानतळांवरील सुरक्षा तपासणीदरम्यान प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी सरकार सुरक्षा उपकरणे, सुरक्षा मनुष्यबळ वाढवून आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून सातत्याने प्रयत्न करत आहे. चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करून बायोमेट्रिक-आधारित प्रवासाद्वारे विमानतळांवर प्रवाशांना अखंड आणि त्रास-मुक्त अनुभव देणारी सुविधा आहे.
हिंदुस्थान समाचार
