गृहमंत्रालयाशी चर्चेनंतर संघटनेचा निर्णय
‘हिट एण्ड रन’ कायदा तुर्तास लागू नाही
नवी दिल्ली, 02 जानेवारी (हिं.स.) : देशभरातील ट्रक अन् टँकर चालकांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनेची बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत गृहमंत्रालयाने ‘हीट एण्ड रन’ कायदा तुर्तास लागू होणार नाही असे जाहीर केलेय. त्यानंतर वाहतूकदारसंघटनेने संप मागे घेण्याची घोषणा केली.
यासंदर्भात केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला म्हणाले की, आम्ही ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे, सरकारला असे म्हणायचे आहे की नवीन नियम अद्याप लागू झाला नाही, आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की भारतीय न्याय संहिता 106/2 लागू करण्यापूर्वी, आम्ही ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी चर्चा करू आणि त्यानंतरच निर्णय घेऊ अशी ग्वाही भल्ला यांनी दिली. तर ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष अमृत लाल मदन यांनी सांगितले की, तुम्ही आमचे ड्रायव्हर नाही तर आमचे सैनिक आहात. तुमची कोणतीही गैरसोय व्हावी अशी आमची इच्छा नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 10 वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. तसेच दंड आकारण्यात आला आहे, तो होल्डवर आहे. जोपर्यंत ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसची पुढील बैठक होत नाही तोपर्यंत कोणताही कायदा लागू केला जाणार नाही. हिट अँड रन कायद्यातील नवीन दंडात्मक तरतुदींविरोधातील आंदोलन लवकरच मागे घेण्यात येईल, असेही ट्रकर्स असोसिएशनने म्हटले आहे.
हिंदुस्थान समाचार
