देवघर, 24 ऑक्टोबर (हिं.स.) : झारखंडच्या देवघर जिल्ह्यात आज, मंगळवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली. नदीच्या पुलावरुन कार कोसळून एकाच कुटुबातील 5 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नदीतून कार बाहेर काढली.
देवघरचे पोलीस अधीक्षक अजीत पीटर डुंगडुंग यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, आज, मंगळवारी सकाळी पुलावरुन सिकटिया बॅराजमध्ये बलेरो कार कोसळून हा अपघात झाला.वेगात आलेल्या कारने पुलावरुन जाताना रस्त्याच्या कडेला असलेले रोलिंग तोडले. त्यामुळे, बॅराजजवळी कॅनॉलमध्ये कार कोसळली, त्यामध्ये कारमधील 5 प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यात, एका लहान मुलाचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, पोलिसांना बोलावण्यात आले, पोलिसांनी क्रेनच्या मदतीने कॅनॉलमधून कार बाहेर काढली.
हिंदुस्थान समाचार
