जम्मू, २६ ऑगस्ट (हिं.स.). जम्मू प्रदेशात खराब हवामानामुळे माता वैष्णोदेवीची यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की आज सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसामुळे जम्मूमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यांनी सांगितले की, हवामान परिस्थिती लक्षात घेता अधिकाऱ्यांनी दोन दिवसांसाठी शाळा देखील बंद ठेवल्या आहेत. खबरदारी म्हणून, अनेक रस्ते आधीच बंद करण्यात आले आहेत आणि पूल वाहून गेल्याची माहिती देखील आहे. त्यांनी सांगितले की, यात्रेकरू आणि सामान्य लोकांच्या सुरक्षिततेसाठी, हवामान परिस्थिती सुधारेपर्यंत यात्रा देखील पुढे ढकलण्यात आली आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
