cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > कर्नाटकात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संघर्ष चिघळला
National

कर्नाटकात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संघर्ष चिघळला

CliQ INDIA
Last updated: November 15, 2025 6:35 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE
ऊस आंदोलक

– आंदोलकांनी शेकडो ट्रॅक्टर पेटवले, हजारो टन ऊस जळून खाक

बंगळुरू, 14 नोव्हेंबर (हिं.स.) – ऊसाला 3,500 रुपये प्रति टन ऊस दर मिळावा, यासाठी कर्नाटकमध्ये आठवडाभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान मुधोळ, बागलकोट आणि विजयपुरा या जिल्ह्यांतील ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला गुरुवारी हिंसक वळण लागले. बागलकोट जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संघर्ष चिघळला. मुधोळ तालुक्यातील महालिंगपूर शहराजवळील संगनट्टी क्रॉस येथे आंदोलकांनी शेकडो ट्रॅक्टर पेटवले. या घटनेत हजारो टन ऊस जळून खाक झाला आहे. तीन तालुक्यांमध्ये भारतीय न्याय संहितेचे (बीएनएस) कलम १६३ लागू करण्यात आले आहे

राज्य सरकारने काढलेला प्रतिटन 3300 रुपये देण्याचा तोडगा अमान्य करत, मुधोळमध्ये शेतकऱ्यांनी उसाला प्रतिटन 3,500 ऊस दर देण्याची मागणी करत आंदोलन छेडले होते. सुरुवातीला निपाणी-महालिंगपूर राज्य महामार्गावर त्यांनी वाहतूक रोखली. नंतर संतप्त शेतकऱ्यांनी सैदापूर साखर कारखान्याला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त शेतकऱ्यांनी सैदापूर साखर कारखान्याच्या शेडजवळ उसाने भरलेले ट्रॅक्टर पेटवून दिले. घटनास्थळी सुमारे २०० हून अधिक ट्रॅक्टर उभे होते. ऊस पेटवल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.

ऊस दर घोषित करण्याच्या मागणीसाठी ७ नोव्हेंबर रोजी पुणे-बंगळुरु महामार्गावरील हत्तरगी टोल नाक्यावर झालेल्या आंदोलनादरम्यान दगडफेकीच्या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी जिल्हा पोलिसप्रमुख कार्यालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. ही घटना घडली होती.

शेतकऱ्यांचे नेते मुत्तप्पा कोमर यांनी आरोप केला की, शेतकऱ्यांना बदनाम करण्यासाठी गुंडांनी हिंसाचार केला. काही शेतकऱ्यांनी जमखंडी तालुक्यातील सिद्धापूरजवळ हुबळी-सोलापूर महामार्ग रोखला, ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. हुनूर आणि हुल्याल गावांमध्येही रस्ते अडवण्यात आले.

एसपी सिद्धार्थ गोयल म्हणाले की, शेतकऱ्यांनी दगडफेकही केली, ज्यामध्ये काही पोलिस जखमी आणि काही लोक जखमीही झाले. त्यांनी स्वतः परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर, बागलकोटच्या उपायुक्तांनी बीएनएसएस-२०२३ च्या कलम १६३ अंतर्गत आदेश जारी केले. ज्यात १३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ ते १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जमखंडी, मुधोळ आणि रबकवी-बनाहट्टी तालुक्यांमध्ये निदर्शने, संप आणि कोणत्याही मेळाव्यावर बंदी घालण्यात आली.

शेतकरी नेते सुभाष शिरबूर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी आग लावली नाही. त्यांच्या मते, कारखान्याशी संबंधित लोक पोलिसांसमोरच आग लावत होते. पोलिसांच्या वाहनावरही हल्ला करण्यात आला. शेतकऱ्यांना बदनाम करण्यासाठी आग लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजपा नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक म्हणाले की, शेकडो टन ऊस आणि लाखो रुपयांचे ट्रॅक्टर जळताना पाहून मन हेलावून जाते. काँग्रेस सरकारवर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी शेतकऱ्यांना भरपाई देण्याची आणि मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची मागणी केली.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आणि म्हटले की, शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत, परंतु सरकार साखर कारखानदारांच्या दबावाखाली आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी

You Might Also Like

केरळच्या किनाऱ्याजवळून सहा भारतीयांसह इराणची बोट ताब्यात
रत्नागिरी : आमदार साळवींकडे एसीबीची झाडाझडती
न्या. खन्ना बनणार नवे सरन्यायमूर्ती | BulletsIn
महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर – मुख्यमंत्री
महाराष्ट्रासाठी 1 लाख 73 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी – अश्विनी वैष्णव | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article बांगलादेशचे सुरक्षा सल्लागार २० नोव्हेंबरला भारत दौऱ्यावर
Next Article नंदुरबार – 22 नोव्हेंबर रोजी जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?